
सातपुड्याच्या निसर्गरम्य नयनरम्य दऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील खर्गोन जिल्ह्यात शिरवेल हे महादेवाचे मंदिर (गुंफा) आहे. हे ठिकाण सावदा येथून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. शतकानुशतके जुन्या असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आजही भक्तांना धबधब्याजवळ उंच लोखंडी शिडी चढून नैसर्गिक गुहेत बसलेल्या भगवान भोले महादेवाचे दर्शन घेतात. येथे असलेली शिवलिंग ही स्वयंभू असल्याने याठिकाणी केले जाणारे नवस हे पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. सातपुड्याच्या निसर्गरम्य नयनरम्य दऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील खर्गोन जिल्ह्यात शिरवेल हे महादेवाचे मंदिर (गुंफा) आहे. हे ठिकाण सावदा येथून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. शतकानुशतके जुन्या असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आजही भक्तांना धबधब्याजवळ उंच लोखंडी शिडी चढून नैसर्गिक गुहेत बसलेल्या भगवान भोले महादेवाचे दर्शन घेतात. येथे असलेली शिवलिंग ही स्वयंभू असल्याने याठिकाणी केले जाणारे नवस हे पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील महादेव मंदिर हे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात पुरातन असे हेमाडपंथी महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर हे पुरातन महादेव मंदिर आहे. मंदिराचे अंतर आणि बाह्य भागातील कोरीव शिल्प या मंदिराच्या पौराणिकतेचे दाखले देतात. या मंदिराच्या परिसरात आजही कोरीव शिल्प केलेले खांब पडून आहेत.जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील उमाळे या गावातील उमा-महेश्वराचे शिवमंदीर आहे पासून उमाळे हे गाव 14 किमी अंतरावर आहे. उमा-महेश्वराचे शिवमंदीर जागृत स्थान असून खान्देश वासियांचे श्रध्दास्थान आहे. हजारो वर्षापूर्वी भगवान शंकर यांनी या भागात वास्तव्य केले होते. यावेळी त्यांनी पिंडाला आकार दिला, अशी अख्यायिका आहे. आज ही वैशिष्टपुर्ण आकाराची पिंड उमा-महेश्वराची पिंड म्हणून ओळखली जाते. उमा म्हणजेच माता पार्वती व महेश्वर म्हणजेच भगवान शंकर असा याचा अर्थ आहे.
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे दिडशे ते दोनशे वर्षापुर्वीचे निळकंठेश्वर महादेवाचे उत्कृष्ट शिल्पकला असलेले आहे. नवसाला पावणारा निळकंठेश्वर महादेव अशी या मंदिरातील मुर्तीची आख्यायिका आहे. या महादेव मंदिराचा गर्भागार सुमारे 15 बाय 15 फुट असून मध्यभागी गंडकीच्या काळ्या पाषाणाचे सुमारे पावणेदोन फुट उंचीचे शिवलिंग आहे. त्यावर 9 इंच व्यासाची सुमारे एक फुट उंचीची पिंड आहे. या पिंडीवर वेढा दिलेली नागमुर्ति आहे. समोरच बैठकीवरच एक ते दोन फुट उंचीची नंदीची केसराची मुर्ति आहे. त्याच्या गळ्यात कोरलेल्या घुंगरु माळा ,घंटा पिठासन अत्यंत विलोभनीय आहे.जिल्ह्यातील उंदीरखेडे येथे नागेश्वर महादेव मंदिर आहे. उंदीरखेडे हे पारोळा या तालुक्याच्या गावापासून पाच किलोमीटरवर आहे. तेथून पुढे दोन किलोमीटरवर एका टेकडीवर महादेव मंदिर आहे. पेशवेकाळात खान्देश प्रांतचे सुभेदार त्रिंबकराव मामा पेठे यांनी हे मंदिर बांधले आहे. नागेश्वर मंदिराचा परिसर काळ्या पाषाणाच्या बांधकामामुळे लक्ष वेधून घेते. या मंदिरातील नंदी, बागे जवळचे कैलास पर्वत शिल्प, मंदिरातील इतर देवतांची आरास, येथील नदीपात्र आणि बाग अशा अनेक लक्षवेधक गोष्टी येथे आहे.भुसावळ जवळ असलेल्या वेल्हाळे येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर, हे मंदिर पाषाणातील असून अतिप्राचीन असे आहे मंदिराची शैली ही हेमाडपंती असून मंदिरात श्री उमा महेश्वर विराजमान आहेत, मंदिरावर आणि आसपास खूप सुंदर शिल्प आहेत.
अमळनेर तालुक्यातील नीम शिवारातील पांझरा, तापी या नदीच्या पवित्र संगमावर श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. अतिप्राचीन, भव्य आणि पुरातन हेमांडपंथी शिव मंदिर म्हणून याचा विशेष लौकिक आहे. या मंदिराला एक हजार वर्षापूवीचा इतिहास लाभलेला असल्याने या ठिकाणी कपिलमुनींनी तपश्चर्या करुण महादेवाची पिण्डीची स्थापना केली होती. यामुळे या मंदिराला कपिलेश्वर महादेव मंदिर हे नाव पडले आहे. या मंदिराचे बाधकाम पुरातन असून त्यानंतर थोरसमाज सेविका अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेखात आढळून येते.जळगाव शहरापासून साधारणतः ५ किलोमीटर अंतरावर निमखेडी शिवारात श्री शिवधाम मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच सर्वात आधी मोठ्या वारुळाचे दर्शन होते. भाविक असे म्हणतात की वारुळात एक नाग असून दरवर्षी मंदिराची उंची काही इंचाने वाढत असते. मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात महादेवाची मनमोहक मूर्ती व शिवलिंग आहे. मंदिराच्या मागील बाजूला राधाकृष्ण, राम लक्ष्मण सीता व हनुमान यांची देखील आकर्षक मूर्ती विराजमान आहे.
जळगावातून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर वडनगरी फाटा या ठिकाणी बडे जटाधारी महादेव मंदिर आहे. बडे जटाधारी महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून येथे भाविकांनी मानलेल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. मंदिराच्या सुरवातीलाच मोठा पिंपळाचा वृक्ष आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे त्यानंतर प्रवेश होतो प्रमुख मंदिरात. मंदिराच्या गाभाऱ्यात बडे जटाधारी महादेवाचे सुरेख असे सोनेरी रंगाच शिवलिंग आहे. शिवलिंगावर त्रिपुंड व ओम आहे. बडे जटाधारी महादेव मंदिराचा कळस ५१ फूट उंचीचा असून यातील लक्षवेधी बाब म्हणजे या कळसावर बारा ज्योतिर्लिंगाच हि दर्शन होत असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर