स्वामी अविमुक्तेश्वरानंद व शिष्यांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश
प्रयागराज जिल्हा न्यायालयने दिले आदेश प्रयागराज, 21 फेब्रुवारी (हिं.स.) : इलाहाबाद जिल्हा न्यायालय येथील पॉक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक) न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य दंडी स्वामी प्रत्यक्त चैतन्य मुकुंदानंद
स्वामी अविमुक्तेश्वरानंद संग्रहित फोटो


प्रयागराज जिल्हा न्यायालयने दिले आदेश

प्रयागराज, 21 फेब्रुवारी (हिं.स.) : इलाहाबाद जिल्हा न्यायालय येथील पॉक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक) न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य दंडी स्वामी प्रत्यक्त चैतन्य मुकुंदानंद गिरी यांच्याविरुद्ध बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश आशुतोष ब्रह्मचारी यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना देण्यात आला.

न्यायालयाने कथित शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लक्षात घेऊन एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले. विशेष न्यायाधीश (लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) विनोद कुमार चौरसिया यांच्या न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य दंडी स्वामी प्रत्यक्त चैतन्य मुकुंदानंद गिरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. न्यायालयाने पोलिसांना एफआयआर नोंदवून प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर झूंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 173 (4) अंतर्गत शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी एफआयआर नोंदवून कठोर कारवाईची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande