जळगाव - होळीनिमित्त भुसावळमार्गे ३० विशेष गाड्यांची घोषणा
जळगाव, 21 फेब्रुवारी (हिं.स.) होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. यातच होळीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने ३० विशेष गाड्या चालविण्याचा तसेच काही विशेष गाड्यांच्या स
जळगाव - होळीनिमित्त भुसावळमार्गे ३० विशेष गाड्यांची घोषणा


जळगाव, 21 फेब्रुवारी (हिं.स.) होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. यातच होळीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने ३० विशेष गाड्या चालविण्याचा तसेच काही विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथून सुलतानपूर, वाराणसी, रक्सौल, सहरसा आणि धनबाद या प्रमुख स्थानकांदरम्यान धावणार आहेत. विशेष यातील काही गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर क्र. ०४२११ ही गाडी २७ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी मुंबईहून सुटेल, तर क्र. ०४२१२ ही गाडी २६ फेब्रुवारी व २ मार्च रोजी सुलतानपूरहून सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी क्र. ०४२२५ ही गाडी २६ फेब्रुवारी व २ मार्च रोजी मुंबईहून सुटेल, तर क्र. ०४२२६ ही गाडी २५ फेब्रुवारी व १ मार्च रोजी वाराणसीहून सुटेल.

या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, झाशी, कानपूर आणि लखनौ या स्थानकांवर थांबा असेल.लोकमान्य टिळक टर्मिनस रक्सौल दरम्यान क्र. ०५५५८ ही गाडी १२ मार्च ते २ एप्रिल, प्रत्येक गुरुवार आणि क्र. ०५५५७ ही गाडी १० मार्च ते ३१ मार्च या दरम्यान प्रत्येक मंगळवार अशा ८ फेऱ्या केल्या जातील. लोकमान्य टिळक टर्मिनस सहरसा दरम्यान क्र. ०५५८६ ही गाडी ८ मार्च ते २९ मार्च, प्रत्येक रविवारी आणि क्र. ०५५८५ ही गाडी ६ मार्च ते २७मार्च, प्रत्येक शुक्रवार अशा ८ फेऱ्या असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद दरम्यान क्र. ०३३८० ही गाडी १२ मार्च ते २६ मार्च दरम्यान प्रत्येक गुरुवार आणि क्र. ०३३७९ ही गाडी १० मार्च ते २४ मार्च दरम्यान प्रत्येक मंगळवारी अशा ६ फेऱ्या असतील, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande