अंबाजोगाई रोटरीच्या वतीने शीत शवपेटीचे लोकार्पण
बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। अंबाजोगाईत उम्मीद ट्रस्ट संचलित जनसेवा हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. रोटरीच्या १२१ व्या वर्धापन दिनानिमित रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने उम्मीद ट्र
अंबाजोगाई रोटरीच्या वतीने शीत शवपेटीचे लोकार्पण


बीड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

अंबाजोगाईत उम्मीद ट्रस्ट संचलित जनसेवा हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

रोटरीच्या १२१ व्या वर्धापन दिनानिमित रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने उम्मीद ट्रस्ट संचलित जनसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ. तौफिकखान पठाण यांच्याकडे शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी रोटरीचे प्रांत पब्लिक इमेज डायरेक्टर नीलेश वाईकर, पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, रोटरीच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, उपाध्यक्ष धनराज सोळंकी, सचिव मंजूषा जोशी, सहसचिव राधेश्याम लोहिया, प्रा. संतोष मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

१२१ व्या रोटरीच्या वर्धापन दिनी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande