डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना तात्काळ सुरू करणार - राज्यमंत्री आशिष जयस्वाल
* ३१ मार्चपर्यंत प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती देखील संबंधित विद्यार्थ्यांना अदा करणार मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष
डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना तात्काळ सुरू करणार - राज्यमंत्री आशिष जयस्वाल


* ३१ मार्चपर्यंत प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती देखील संबंधित विद्यार्थ्यांना अदा करणार

मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला.

या चर्चेदरम्यान राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सदर योजना तात्काळ सुरू करण्याचे आणि ३१ मार्चपर्यंत प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती देखील संबंधित विद्यार्थ्यांना अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच भविष्यात देखील ही योजना सुरू राहिले असेही नमूद केले.

जयंतराव पाटील म्हणाले की, योजना सुरू नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागले. काहींनी कायमस्वरूपी शिक्षण सोडले. सरकारने शिष्यवृत्तीची व्यवस्था केली नसल्याने त्याचा परिणाम अनेक गरीब विद्यार्थ्यांवर झाला. २०२५-२६ करिता ५.९६ कोटी रुपयांचे नियोजन केले आहे, असे उत्तरात नमूद आहे. मात्र नियोजन केले हा शब्द योग्य नाही. पुरवणी मागणीत आहे का? ते प्रत्यक्ष वितरित कधी होणार? वर्ष संपत आल्यावर तुम्ही शिष्यवृत्ती देणार का? किमान सप्टेंबर पर्यंत या शिष्यवृत्ती वर्ग करण्याची व्यवस्था सरकार पुढील वर्षांपासून करेल का? २०२५-२६ साठीचा नियोजित निधी विद्यार्थ्यांना कधी मिळणार याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे. तसेच भविष्यात ही योजना सुरू ठेवणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande