
छत्रपती संभाजीनगर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बॅंक हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याद्वारे वाचन चळवळीलाही बळकटी मिळेल,असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बुक बॅंक’ उपक्रमांतर्गत १००० पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून बुक बॅंक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल अधिकारी- कर्मचारी यांनी स्वतःच्या देणगीतून १००० पुस्तके खरेदी करुन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व आश्विनी लाटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच अन्य महसूल अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis