बीएलएच्या अत्याधुनिक शस्त्रांचा सामना करण्यास पाक सैन्य असक्षम - ख्वाजा आसिफ
इस्लामाबाद , 04 फेब्रुवारी (हिं.स.)। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कर बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए)समोर अक्षरशः गुडघे टेकत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सभागृहात (नॅशनल असेंब्ली) दिलेल्या निवेदनात म
बीएलएच्या अत्याधुनिक शस्त्रांचा सामना करण्यास पाक सैन्य सक्षम नाही- ख्वाजा आसिफ


इस्लामाबाद , 04 फेब्रुवारी (हिं.स.)। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कर बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए)समोर अक्षरशः गुडघे टेकत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सभागृहात (नॅशनल असेंब्ली) दिलेल्या निवेदनात मान्य केले आहे की पाकिस्तानी लष्कर बलोच लढवय्यांचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. त्यांनी कबूल केले की बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या बलोच बंडखोर चळवळीला रोखण्यात सरकार आणि लष्कर दोन्हीही पूर्णतः निष्प्रभ ठरले आहेत.

ख्वाजा आसिफ म्हणाले की बीएलएकडे इतकी अत्याधुनिक शस्त्रे आहेत, जी पाकिस्तानी लष्कराकडेही नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, बीएलएने गेल्या तीन दिवसांच्या संघर्षात 200हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. ख्वाजा यांनी बलोच लढवय्यांची ताकद खूप मोठी असल्याचे स्पष्टपणे मान्य केले. “आपण फक्त आपल्या सैनिकांचे मृतदेह उचलत आहोत,” असे त्यांनी सभागृहात सांगितले.

ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की बलुचिस्तान पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या 40 टक्क्यांहून अधिक क्षेत्रफळ व्यापतो आणि इतक्या विशाल प्रदेशावर नियंत्रण ठेवणे अत्यंत अवघड आहे. त्यांनी हेही मान्य केले की एवढ्या मोठ्या भागात गस्त घालणे आणि सुरक्षा पुरवणे कठीण असल्याने लष्कराचे जवान “शारीरिकदृष्ट्या अपंग” झाल्यासारख्या स्थितीत आहेत. त्यांनी बलोच बंडखोरांकडे अधिक आधुनिक आणि प्रभावी शस्त्रसज्जता असल्याचेही मान्य केले.

पाकिस्तानी लष्कर बीएलएकडे असलेल्या शस्त्रांमुळे भयभीत असल्याचे ख्वाजा यांच्या विधानातून स्पष्ट होते. त्यांनी सांगितले की बंडखोरांकडे अत्याधुनिक रायफल्स, नाइट व्हिजन उपकरणे, उष्णता ओळखणारे लेझर (ज्यांची किंमत 4 ते 5 हजार डॉलर्स आहे) आणि पूर्ण युद्धसज्ज किट (सुमारे 20 हजार डॉलर्सचे पॅकेज) आहे, जे पाकिस्तानी लष्कराकडेही उपलब्ध नाहीत.

संरक्षणमंत्र्यांनी आरोप केला की बंडखोर प्रामुख्याने पंजाबी मजूर, सामान्य नागरिक आणि अल्प उत्पन्न गटांतील लोकांना लक्ष्य करून त्यांचे शोषण करत आहेत. त्यांनी इशारा दिला की पाकिस्तान आता ही परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकत नाही आणि बंडखोरांकडे अत्याधुनिक अमेरिकी शस्त्रे आहेत. मात्र, बीएलएला “दहशतवादी संघटना” ठरवत त्यांनी त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आणि महिलां-मुलांना लक्ष्य करणाऱ्यांशी कोणताही करार होणार नाही, असे ठामपणे सांगितले.

ख्वाजा आसिफ यांचे हे विधान अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा बीएलए लढवय्यांनी बलुचिस्तानमधील 15हून अधिक शहरांवर नियंत्रण मिळवल्याचा आणि 200हून अधिक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने उघडपणे कबूल केले आहे की तो परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ख्वाजा यांची ही कबुली पाकिस्तानसमोरील गंभीर अंतर्गत सुरक्षा आव्हाने अधोरेखित करते, जिथे बलुचिस्तानमधील विभाजनवादी चळवळ वेगाने तीव्र होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande