सचिन तेंडुलकरचा मुंबईच्या रणजी संघाला गुरुमंत्र
मुंबई, 04 फेब्रुवारी (हिं.स.) मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कर्नाटकविरुद्धच्या रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी मुंबईच्या क्रिकेटपटूंना दबाव हाताळण्याबद्दल आणि विजयी मानसिकता टिकवून ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले. ४२ वेळा रणजी विजेते
सचिन तेंडलुकरचा मुंबई रणजी संघाशी संवाद


मुंबई, 04 फेब्रुवारी (हिं.स.) मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कर्नाटकविरुद्धच्या रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी मुंबईच्या क्रिकेटपटूंना दबाव हाताळण्याबद्दल आणि विजयी मानसिकता टिकवून ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले. ४२ वेळा रणजी विजेतेपद पटकावलेला मुंबई संघ, आठ वेळा विजेतेपद मिळवलेल्या कर्नाटक संघाशी ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान एमसीए-बीकेसी मैदानावर २०२५-२६ हंगामाच्या उपांत्यपूर्व फेरीत भिडणार आहे.

“आज ड्रेसिंग रूममध्ये सचिन सर उपस्थित होते हे आमचे भाग्य होते. केवळ प्रोत्साहनपर भाषणाऐवजी, ते एक प्रश्नोत्तर सत्रच होते,” असे मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने एका निवेदनात म्हटले. “सर्व क्रिकेटपटूंनी आणि संबंधित प्रशिक्षकांनी त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारले. हे प्रश्न दृष्टिकोन, तयारी, विजयी मानसिकता आणि कठीण परिस्थितीत दबाव हाताळण्याबद्दल होते.”

दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर राहिल्यानंतर या बाद फेरीच्या सामन्यासाठी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालसोबत संघात परतलेल्या ठाकूरने पुढे सांगितले की, सचिन सरांचे मार्गदर्शन मुंबई संघासाठी नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे आणि सर्व क्रिकेटपटूंना या सर्वोत्तम क्रिकेटपटूकडून ज्ञानाचे बोल ऐकून आनंद झाला.

मुंबईने एलिट गट सी मध्ये अव्वल स्थान पटकावून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे, तर कर्नाटकने आपल्या शेवटच्या गट साखळी सामन्यात पंजाबविरुद्ध नाट्यमय विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande