अकोला मनपा शाळांतील लीडर माता कार्यशाळा व शिक्षक शिक्षण परिषद संपन्न
अकोला, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या निर्देशानुसार तसेच उपायुक्त विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी हरिशचंद्र इटकर यांच्या नियोजनात अकोला महानगरपालिका अधिनस्त शाळांमध्ये कार्यरत लीडर माता-पालकां
Photo


अकोला, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।

मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या निर्देशानुसार तसेच उपायुक्त विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी हरिशचंद्र इटकर यांच्या नियोजनात अकोला महानगरपालिका अधिनस्त शाळांमध्ये कार्यरत लीडर माता-पालकांची कार्यशाळा तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांची शिक्षण परिषद अकोला येथील डाबकी रोडवरील भिरड मंगल कार्यालय येथे यशस्वीरित्या पार पडली.

सकाळी १० ते १२.३० या वेळेत मनपा शाळांमधील लीडर माता-पालकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यानंतर अकोला महानगरपालिकेच्या ३१ शाळांतील कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षकांची शिक्षण परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमास निपुण महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून योगेश कोळसे, गणेश पाटील, कृष्णा पवार, सोमनाथ ठोंबरे, तौफिक सय्यद तसेच अमरावती विभागीय समन्वयक वैभव निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सदर दोन्ही कार्यक्रम शिक्षणाधिकारी श्री हरिश्चंद्र इटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समग्र शिक्षा अभियानाचे गट समन्वयक हबीबूर रहमान यांनी केले.

मार्गदर्शनपर भाषणे श्रीमती लीना रामटेके, वैशाली शेंडे, मोहम्मद अब्दुल अजीज (मुख्याध्यापक), राजू भिरड (मुख्याध्यापक) तसेच शिक्षणाधिकारी हरिशचंद्र इटकर यांनी केली. या उपक्रमात सुमारे २५० लीडर माता-पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर मनपा शाळांतील २०० शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लीडर माता-पालकांचा शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व लीडर मातांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी, माता-पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी आणि शिक्षकांच्या शैक्षणिक क्षमतेला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande