आमदार अमोल मिटकरी यांचा पुन्हा गंभीर दावा!
अकोला, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर दावा व्यक्त केला असून, विमान कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी त्यांनी
आमदार अमोल मिटकरी यांचा पुन्हा गंभीर दावा!


अकोला, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर दावा व्यक्त केला असून, विमान कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी त्यांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. विमान कंपनी आणि विम्याबाबत मिटकरींचा संशय अमोल मिटकरी यांनी 'व्हीएसआर' या विमान कंपनीवर निशाणा साधताना म्हटले आहे की, कंपनीने डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या प्रत्येक वैमानिकाचा ५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता.

जानेवारी महिन्यातच ही दुर्घटना घडल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मिटकरींनी असा खळबळजनक प्रश्न उपस्थित केला की, पायलटला संमोहित करून पाठवण्यात आले होते का? त्यांनी या घटनेची तुलना राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या सुसाईड बॉम्बरशी आणि अजमल कसाबशी केली आहे.

त्यांनी कंपनीवर केला आहे. विमानात एकामागून एक स्फोट झाल्याचा दावाही त्यांनी केला असून, वैमानिकाने 'मेडे' कॉल दिल्यानंतरही विमान उतरवण्याचा प्रयत्न केल्याने महाराष्ट्राचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande