भारत अमेरिकेकडून पाच वर्षांत ५०० अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी करू शकेल- पीयूष गोयल
नवी दिल्ली , 08 फेब्रुवारी (हिं.स.)।भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अलीकडील व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील आणि त्यांना नवी दिशा मिळेल, असे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल य
भारत अमेरिकेकडून पाच वर्षांत ५०० अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी करू शकेल- पीयूष गोयल


नवी दिल्ली , 08 फेब्रुवारी (हिं.स.)।भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अलीकडील व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील आणि त्यांना नवी दिशा मिळेल, असे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या कराराबाबत पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रविवारी त्यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत भारताला अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सची वस्तू खरेदी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

भारत -अमेरिका करार अतिशय सुरक्षित असल्याचे गोयल यांनी नमूद केले, कारण त्यांच्या मते भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत सुमारे 2 ट्रिलियन डॉलर्सची मागणी निर्माण करणार आहे. गोयल यांनी सांगितले की, सध्या भारत अमेरिकेकडून 300 अब्ज डॉलर्सपर्यंतचा माल खरेदी करू शकतो, जो सध्या तो इतर देशांकडून आयात करतो.त्यांनी स्पष्ट केले की भारताने अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा अंतिम केला आहे. या कराराअंतर्गत भारत पुढील पाच वर्षांत ऊर्जा उत्पादने, विमाने व त्यांचे सुटे भाग, मौल्यवान धातू, तांत्रिक उत्पादने आणि कोकिंग कोळसा अमेरिकेकडून आयात करण्याचा विचार करत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर भर देताना गोयल म्हणाले की, अमेरिकन बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या उत्पादनांना अधिक चांगला दर मिळेल आणि त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन निर्यात संधी निर्माण होतील, ज्यातून त्यांना अधिक लाभ आणि योग्य मोबदला मिळेल.

गोयल यांनी सांगितले की, आज भारत व्यापार करारांबाबत आत्मविश्वास आणि ताकदीने चर्चा करत आहे. भविष्यात भारत 35 ट्रिलियन डॉलर्सचा बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो, आणि हीच आमची सर्वात मोठी वाटाघाटीची ताकद आहे, असे ते म्हणाले. भारत-अमेरिका शुल्क करारानंतर माध्यमांना दिलेल्या पहिल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. हा करार दोन्ही देशांमधील व्यापक द्विपक्षीय व्यापार कराराच्या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे.

गोयल म्हणाले की, सध्या भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे, मात्र 2047 पर्यंत ती वाढून 30 ते 35 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, तेव्हा भारत एक विकसित राष्ट्र बनेल. हाच भारताचा आत्मविश्वास आहे. या आर्थिक वाढीच्या संधी आम्ही आमच्या व्यापार भागीदारांना देत आहोत. गोयल यांच्या मते, ही भूमिका भारताची दीर्घकालीन रणनीती आणि सामर्थ्य दर्शवते, ज्यामुळे देशात नवीन गुंतवणूक आणि व्यापाराच्या संधी निर्माण होतील.

त्यांनी सांगितले की, भारत आधीच कृषी आणि मत्स्य उत्पादनांचा 55 अब्ज डॉलर्सचा निर्यात व्यापार करत आहे. हा करार शेतकऱ्यांना अधिक निर्यात संधी आणि चांगला नफा मिळवून देणारा ठरेल. अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या नव्या संधींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल आणि कृषी क्षेत्र अधिक समृद्ध होईल.

गोयल यांनी पुढे सांगितले की, भारताने आधीच विमाने आणि इंजिनांसाठी 50 अब्ज डॉलर्सचे ऑर्डर दिले आहेत, आणि पुढील पाच वर्षांत हवाई वाहतूक क्षेत्रासाठी 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची गरज भासणार आहे. याशिवाय तेल, एलएनजी, एलपीजी आणि कच्चे तेलही अमेरिकेकडून आयात केले जाणार आहे. स्टील उद्योगातील वाढत्या मागणीमुळे भारताला दरवर्षी सुमारे 30 अब्ज डॉलर्सच्या कोकिंग कोळशाची आवश्यकता भासेल, असेही त्यांनी नमूद केले. हा माल याआधीही आयात केला जात होता, त्यामुळे यात काही नवीन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोयल म्हणाले की, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत आणि देशात 10 गीगावॅट क्षमतेची डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत. यासाठी लागणारी उपकरणे अमेरिकेकडून उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम संगणन आणि उच्च दर्जाच्या यंत्रसामग्रीची गरजही अमेरिका पूर्ण करू शकते. गोयल यांनी सांगितले की, दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सचा व्यापाराचा अंदाजही अत्यंत सावध आहे, कारण भारताची अर्थव्यवस्था पुढील दशकात 30 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवत आहे. त्यामुळे अमेरिकेसोबतचा व्यापार करार भारतासाठी भविष्यातील वाढती मागणी आणि गुंतवणुकीच्या संधी सुनिश्चित करणारा ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande