डिजिटल इंडियाची जागतिक झेप; ८ हून अधिक देशांत पोहोचला यूपीआय
नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। भारताचा यूपीआय आता केवळ देशापुरता मर्यादित न राहता जागतिक डिजिटल पेमेंट क्षेत्रात नवा मानदंड ठरत आहे. भारताचा स्वदेशी डिजिटल पेमेंट सिस्टम ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (यूपीआय) आज संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूत
UPI


नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। भारताचा यूपीआय आता केवळ देशापुरता मर्यादित न राहता जागतिक डिजिटल पेमेंट क्षेत्रात नवा मानदंड ठरत आहे. भारताचा स्वदेशी डिजिटल पेमेंट सिस्टम ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (यूपीआय) आज संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, मॉरिशस आणि कतारसह ८ हून अधिक देशांत सक्रिय झाला आहे. या यशामुळे भारत जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत एक प्रभावी ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून उदयास आला आहे.

संसदेत माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी सांगितले की, यूपीआयमुळे भारतीय पर्यटकांना परदेशात व्यवहार करणे सोपे झाले असून, रेमिटन्सची आवकही वाढली आहे. यामुळे देशाची फिनटेक स्थिती अधिक मजबूत झाली असून, आर्थिक समावेशनाला नवा वेग मिळाला आहे.

भारताने आतापर्यंत २३ देशांशी डिजिटल सहकार्याचे सामंजस्य करार केले आहेत. या करारांद्वारे भारताचे ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’ (डीपीआय) आणि ‘इंडिया स्टॅक’ जगासमोर सादर केले जात आहेत. आधार, डेटा एक्सचेंज, सेवा वितरण आणि डिजिलॉकरसारख्या उपक्रमांमध्ये क्यूबा, केन्या आणि लाओससारख्या देशांनी विशेष रस दाखवला आहे.

G20 अध्यक्षतेदरम्यान भारताने ‘ग्लोबल डीपीआय रिपॉझिटरी’ सुरू केली असून, आधार, कोविन, आरोग्य सेतू आणि ई-संजीवनी यांसारखी यशस्वी डिजिटल मॉडेल्स जागतिक स्तरावर शेअर केली आहेत. ‘इंडिया स्टॅक ग्लोबल’ पोर्टलच्या माध्यमातून भारत मित्र राष्ट्रांना आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स स्वीकारण्यासाठी तांत्रिक मदतही देत आहे.

एनपीसीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात यूपीआय व्यवहारांमध्ये २८ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली असून व्यवहारांची संख्या २१.७० अब्जांवर पोहोचली आहे. एकूण व्यवहार मूल्य २८.३३ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. या आकड्यांमधून भारतातील डिजिटल क्रांतीचा वेग आणि जागतिक स्तरावरील प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande