इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी एस. जयशंकर यांची चर्चा
नवी दिल्ली , 11 मार्च (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर आणि इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. या चर्चेची माहिती
एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी केली पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा


नवी दिल्ली , 11 मार्च (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर आणि इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. या चर्चेची माहिती जयशंकर यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून शेअर केली.

जयशंकर यांनी लिहिले की, आज सायंकाळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून दोन्ही देश पुढेही संपर्कात राहण्यास सहमत झाले आहेत. या चर्चेनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी लवकरच पावले उचलली जाऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी भारत सरकारने प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल गाईडलाईन) जारी करत विद्यार्थ्यांना आर्मेनिया सीमेच्या मार्गाने भारतात परतण्याचा पर्याय दिला होता. मात्र भारतीय दूतावासाने स्पष्ट केले होते की हा प्रवास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जोखमीवर करायचा असेल.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी जर्मनी आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही चर्चा केली. आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांच्यासोबत पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारांची देवाणघेवाण झाली. तसेच दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्यून यांच्याशीही पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत संघर्षाचा ऊर्जा क्षेत्रावर होणारा परिणाम आणि द्विपक्षीय अजेंडा पुढे नेण्यासंदर्भातील मुद्द्यांवरही चर्चा झाली.

याशिवाय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याशीही पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली. ताजानी यांनी सांगितले की, परिस्थिती लवकर नियंत्रणात आणणे, समुद्री मार्गांची मुक्त वाहतूक सुनिश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी ते जयशंकर यांच्यासोबत समन्वयाने काम करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande