नाशिक - जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रम
स्पेशल किडनी केअर पॅकेज’चे उद्घाटन नाशिक, 13 मार्च (हिं.स.)। जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळ
Awareness program at Ashoka


स्पेशल किडनी केअर पॅकेज’चे उद्घाटन

नाशिक, 13 मार्च (हिं.स.)। जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विपुल गट्टाणी, डॉ. इरावती वाघमारे, युरोलॉजिस्ट डॉ. श्याम तलरेजा तसेच सीव्हीटीएस तज्ज्ञ डॉ. प्रणव माळी उपस्थित होते. त्यांनी किडनीचे आजार वाढण्यामागील कारणे, त्यांचे निदान आणि उपचार पद्धती याबाबत माहिती दिली.

डॉ. विपुल गट्टाणी यांनी सांगितले की, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अनियमित आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. डॉ. इरावती वाघमारे यांनी संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम यांचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉ. श्याम तलरेजा यांनी किडनी स्टोन व इतर मूत्रविज्ञानाशी संबंधित आजार वेळेवर ओळखून उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते, असे सांगितले.

यावेळी ‘स्पेशल किडनी केअर पॅकेज’चे उद्घाटन करण्यात आले. या पॅकेजमध्ये संपूर्ण रक्त तपासणी (सीबीसी), सीरम क्रिएटिनिन, सीरम युरिक अॅसिड आणि लघवीची सामान्य तपासणी तसेच नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला रु. ४९९ मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की, किडनीच्या आजारांबाबत जनजागृती आणि वेळेवर तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना किफायतशीर दरात आवश्यक तपासण्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande