हरियाणा: अंबालामध्ये 2 किलो आरडीएक्स सापडले
घटनास्थळ सील, एसटीएफ व बॉम्ब स्क्वॉड तैनात अंबाला 13 मार्च (हिं.स.) : हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील बराडा परिसरात आरडीएक्स सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसटीएफ आणि बॉम्ब स्क्वॉडचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे. सुरक्षेच्
आरडीएक्सचा प्रतिकात्मक लोगो


घटनास्थळ सील, एसटीएफ व बॉम्ब स्क्वॉड तैनात

अंबाला 13 मार्च (हिं.स.) : हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील बराडा परिसरात आरडीएक्स सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसटीएफ आणि बॉम्ब स्क्वॉडचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बराडा रोड पूर्णपणे बंद करण्यात आला असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, सुमारे दोन किलो आरडीएक्स आढळल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसटीएफ आणि जिल्हा पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, सध्या पोलीस अधिकारी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात अंबालातील बलदेव नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात उभी असलेल्या डीएल-3सीएझेड-6651 क्रमांकाच्या कारमध्ये दोन वेळा स्फोट झाले होते. त्या वेळी सुमारे 250 पोलीस कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी एअरफोर्स स्टेशनजवळ कडक तपासणी मोहीम राबवत होते. या घटनेनंतर बलदेव नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध स्फोटक पदार्थ कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान कारमध्ये प्रत्येकी 5 किलो वजनाचे 3 एलपीजी सिलिंडर आढळले होते आणि त्यावर रेग्युलेटरही बसवलेले होते.

दरम्यान, पोलीस ठाण्यात उभी असलेल्या त्या कारला संध्याकाळी आग लागली होती. सुरुवातीला पोलिसांनी ती सामान्य घटना समजून आग विझवली होती. मात्र शनिवारी रात्री सुमारे 8 वाजता एसपी यांनी स्वतः बलदेव नगर पोलीस ठाण्यात फोन करून ठाणे तात्काळ रिकामे करण्याचे निर्देश दिले होते. एका व्हिडिओद्वारे या कारबाबतची माहिती एसपींना मिळाल्याचे सांगितले जाते.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande