परभणी जिल्हा परिषद गटनेतेपदी शिवसेनेच्या सुमनबाई उगले
परभणी, 13 मार्च (हिं.स.)। शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी सुमनबाई उगले यांची तर उपनेतापदी कौशल्याबाई शिंदे यांची निवड करण्यात आली. या निवडीबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संज
परभणी जिल्हा परिषद गटनेतेपदी शिवसेनेच्या सुमनबाई उगले


परभणी, 13 मार्च (हिं.स.)।

शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी सुमनबाई उगले यांची तर उपनेतापदी कौशल्याबाई शिंदे यांची निवड करण्यात आली.

या निवडीबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, महानगर प्रमुख माणिक पौढे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक येत्या 18 मार्च रोजी होणार असून त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 24 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. जिल्हा परिषदेत एकूण 54 सदस्य असून बहुमतासाठी 28 सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत कोणता पक्ष किंवा आघाडी बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande