गूगल मॅप्समध्ये जेमिनी एआय, ‘आस्क मॅप्स’सह मोठं अपडेट
मुंबई, 15 मार्च (हिं.स.)। सुंदर पिचाई यांनी गुगल मॅप्स मध्ये जेमिनी या एआय मॉडेलचा समावेश करण्याची मोठी घोषणा केली. ‘आस्क मॅप्स’ (Ask Maps) आणि ‘इमर्सिव्ह नेव्हिगेशन’ (Immersive Navigation) ही दोन नवी फीचर्स सादर करण्यात आली असून, गेल्या दशकातील गु
Gemini AI Comes to Google Maps


मुंबई, 15 मार्च (हिं.स.)। सुंदर पिचाई यांनी गुगल मॅप्स मध्ये जेमिनी या एआय मॉडेलचा समावेश करण्याची मोठी घोषणा केली. ‘आस्क मॅप्स’ (Ask Maps) आणि ‘इमर्सिव्ह नेव्हिगेशन’ (Immersive Navigation) ही दोन नवी फीचर्स सादर करण्यात आली असून, गेल्या दशकातील गुगल मॅप्स साठीचं हे सर्वात मोठं अपग्रेड मानलं जात आहे. या नव्या बदलांमुळे मॅप्स आता केवळ मार्ग दाखवणारा नकाशा न राहता वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक कन्सिर्जसारखी सेवा देणार आहे.

‘आस्क मॅप्स’ हे फीचर जेमिनी एआयच्या मदतीने गुगल मॅप्सला अधिक संभाषणात्मक बनवते. या फीचरमुळे वापरकर्ते जटिल किंवा अत्यंत विशिष्ट प्रश्न थेट मॅप्सला विचारू शकतात आणि त्यानुसार रिअल-टाइम माहितीवर आधारित वैयक्तिक शिफारसी मिळवू शकतात. उदाहरणार्थ, “रांगेत न उभं राहता सर्वात जवळचं सार्वजनिक शौचालय कुठं आहे?” किंवा “माझ्या फोनची बॅटरी संपत आली आहे, रांगेत न थांबता चार्जिंग कुठे करता येईल?” अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यास मॅप्स त्वरित योग्य पर्याय दाखवत कस्टमाइज्ड नकाशा सादर करतो.

गुगलच्या मते, वापरकर्त्यांनी ‘आस्क मॅप्स’ बटण दाबल्यानंतर मॅप्स जगभरातील अद्ययावत माहितीचा वापर करून संभाषणा ji

च्या स्वरूपात उत्तर देतो आणि प्रवासाची योजना अधिक सोपी करतो. हे फीचर अमेरिका आणि भारतात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसवर तात्काळ सुरू करण्यात आले असून, डेस्कटॉप सपोर्टही लवकरच उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, गुगल मॅप्सच्या दृश्यातही मोठा बदल करण्यात आला आहे. ‘इमर्सिव्ह नेव्हिगेशन’ या नव्या फीचरमुळे नेव्हिगेशन चालू असताना नकाशावर अधिक वास्तवदर्शी अनुभव मिळणार आहे. यात नव्या रंगसंगतीसह 3D इमारती, भूप्रदेशाचे वास्तव चित्रण आणि हिरवळ स्पष्टपणे दिसणार आहे. गुगलच्या मते, या अपडेटमुळे वाहन चालवताना अंदाज लावण्याची गरज कमी होते आणि चालकांना अधिक नैसर्गिक दिशानिर्देश मिळतात. नव्या इंटरफेसमुळे रस्त्यावर लक्ष केंद्रित ठेवणे सोपे होते आणि रिअल-वर्ल्ड माहितीच्या आधारे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनतो. ‘इमर्सिव्ह नेव्हिगेशन’ सध्या अमेरिकेत सुरू झाले असून, येत्या काही महिन्यांत iOS, Android, Apple CarPlay, Android Auto तसेच Google built-in असलेल्या कार्समध्येही ते उपलब्ध होणार आहे.

या दोन्ही फीचर्समुळे गुगल मॅप्स आता केवळ मार्गदर्शक अॅप न राहता दैनंदिन जीवनातील स्मार्ट सहकारी बनत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वापरकर्त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार मार्गदर्शन, वेळेची बचत आणि अधिक सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे. भारतातही हे फीचर्स सुरू झाल्यामुळे लाखो वापरकर्त्यांना त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande