पश्चिम बंगाल विधानसभेसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर
भाजपकडून पहिल्या यादीत 144 उमेदवारांची घोषणा कोलकाता, 16 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी आपली पहिली उमेगवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 144 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
भाजपा लोगो


भाजपकडून पहिल्या यादीत 144 उमेदवारांची घोषणा

कोलकाता, 16 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी आपली पहिली उमेगवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 144 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. नंदीग्राम आणि भवानीपूर या महत्त्वाच्या मतदारसंघांतून शुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अलीद्वारपूर मतदारसंघातून परितोष दास यांना पक्षाने तिकीट दिले आहे.

यावेळी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका 2 टप्प्यांत होणार आहेत. निवडणूक आयोगाने मतदानासाठी 23 एप्रिल आणि 29 एप्रिल या तारखा निश्चित केल्या आहेत. तसेच या निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंगालमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी भाजपने 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, यावरून पक्षाची तयारी किती मजबूत आहे याचा अंदाज येतो.

भाजपने विरोधी पक्षनेते शुवेंदू अधिकारी यांना नंदीग्रामसोबतच भवानीपूरमधूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भवानीपूर हा मतदारसंघ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा असून त्या सध्या येथून आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून शुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यानंतर भवानीपूरचे टीएमसी आमदार सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी आपली जागा रिक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत ममता बॅनर्जी पुन्हा बंगाल विधानसभेत पोहोचल्या होत्या.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande