सोलापूर - बनावट आरटीओ वेबसाईट व लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन
सोलापूर, 17 मार्च, (हिं.स.)। ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलन सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट, मोबाईल अॅप्स व SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकद्वारे नागरिकांची आर्थिक व वैयक्तिक माहितीची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या
सोलापूर - बनावट आरटीओ वेबसाईट व लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन


सोलापूर, 17 मार्च, (हिं.स.)। ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलन सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट, मोबाईल अॅप्स व SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकद्वारे नागरिकांची आर्थिक व वैयक्तिक माहितीची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

नागरिकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत “.gov.in” डोमेन असलेल्या संकेतस्थळांचा वापर करावा. तसेच WhatsApp द्वारे पाठविलेल्या पेमेंट लिंकवर व्यवहार करू नये व अनधिकृत APK अॅप्स डाउनलोड करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संशयास्पद संदेश किंवा लिंक मिळाल्यास सायबर हेल्पलाइन १९३०, www.cybercrime.gov.in किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande