गंगापूर ते अयोध्या 'परिवर्तन' बस धावणार !
रामनवमीपासून एसटीची धार्मिक भेट छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)। प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी एसटी महामंडळाने रामनवमीच्या निमित्ताने एक आनंदाची बातमी दिली आहे. गंगापूर ते अयोध्या अशी थेट बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंड
प्रतिकात्मक  लोगो


रामनवमीपासून एसटीची धार्मिक भेट

छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)। प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी एसटी महामंडळाने रामनवमीच्या निमित्ताने एक आनंदाची बातमी दिली आहे. गंगापूर ते अयोध्या अशी थेट बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, यामुळे भाविकांचा प्रवास सुखाचा आणि अत्यंत स्वस्त होणार आहे.गंगापूरवरून अयोध्येला जाण्या-येण्यासाठी ६ हजार ६५० रूपये भाडे आकारले जाणार आहे. ट्रॅव्हल्सचे हेच भाडे एसटीच्या दीडपट आहे.

गंगापूर ते अयोध्या ही बस भाविकांच्या सुविधेसाठी सुरू केली जात आहे. खासगी बसच्या तुलनेत एसटीचे भाडे अत्यंत कमी आहे. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. लवकरच प्रवासाची अधिकृत तारीख निश्चित केली जाईल.सोयीसाठी हे भाडे निश्चित केले असून ते ऑनलाइन बुकिंग सिस्टममध्ये अपडेट देखील करण्यात आले आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर ही बस धावणार असली, तरी सुटण्याची नेमकी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. प्रशासकीय पातळीवर याच्या तयारीलावेग आला असून लवकरच तारीख जाहीर केली जाईल. भाविकांची गर्दी लक्षात घेता महामंडळाने ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अयोध्येत राम मंदिर निर्माण झाल्यापासून महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रेल्वेचे तिकीट मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि खासगी ट्रॅव्हल्सचे वाढलेले दर यामुळे अनेक भाविक निराश होते. मात्र, एसटीच्या या निर्णयामुळे आता गंगापूर आणि परिसरातील रामभक्तांना थेट आणि परवडणाऱ्या दरात अयोध्येला जाता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande