४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल
गांधीनगर , 17 मार्च (हिं.स.)।‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर ‘नंदा देवी’ मंगळवारी भारतात दाखल झाला. या टँकरमध्ये 46,500 मेट्रिक टनांहून अधिक द्रवित पेट्रोलियम वायू (एलपीजी) आहे. आता अँकरेजवर शिप-टू-शिप ट्रान्सफर प्रक्रिया केली जाणार आहे. दीनदयाल
४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल


गांधीनगर , 17 मार्च (हिं.स.)।‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर ‘नंदा देवी’ मंगळवारी भारतात दाखल झाला. या टँकरमध्ये 46,500 मेट्रिक टनांहून अधिक द्रवित पेट्रोलियम वायू (एलपीजी) आहे. आता अँकरेजवर शिप-टू-शिप ट्रान्सफर प्रक्रिया केली जाणार आहे.

दीनदयाल पोर्ट प्राधिकरण (डीपीए) चे अध्यक्ष सुशील कुमार सिंह यांनी ‘एमटी नंदा देवी’ या मदर व्हेसलच्या कॅप्टन आणि क्रूशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जहाजाला भेट दिली.हे जहाज युद्धग्रस्त होर्मुज सामुद्रधुनी पार करून वाडिनार बंदर, गुजरात येथे पोहोचले. मध्य-पूर्वेतील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीतून प्रवास करणारे हे भारताचे दुसरे जहाज ठरले आहे.

यापूर्वी एक दिवस आधी ‘शिवालिक’ हा एलपीजी टँकर मुंद्रा बंदर, गुजरात येथे 46,000 मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी घेऊन पोहोचला होता. या टँकरमधील गॅस भारतातील घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो वजनाच्या सुमारे 32.4 लाख मानक घरगुती सिलेंडरइतकी होती. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, हे एकमेव जहाज भारताच्या एकूण एलपीजी आयातीच्या गरजेपैकी जवळपास एका दिवसाची गरज पूर्ण करू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande