‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज
सोलापूर, 17 मार्च (हिं.स.)। शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशासाठी सध्या ऑनलाइन अर्ज करणे सुरू आहे. या ऑनलाइन प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्
rte


सोलापूर, 17 मार्च (हिं.स.)। शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशासाठी सध्या ऑनलाइन अर्ज करणे सुरू आहे. या ऑनलाइन प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतराची एक किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना एक ते पाच किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे.

अर्जात दुरुस्ती किंवा नवीन अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.आता प्राधान्याने एक किलोमीटर, त्यानंतर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरातील शाळांचे पर्याय पालकांना निवडता येणार आहेत. तसेच १६ मार्चपर्यंत ज्या पालकांनी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्यांना अर्ज ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande