गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी
पुणे, 19 मार्च (हिं.स.)। गुढीपाडव्याच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवलेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात काही भागांत हलक्या स्वरूपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारी पाऊण एकच्या सुमारास सिंहगड रस्ता वडगाव खुर्द परिसरात मेघगर्जनेसह हलका पाऊ
गुढी पाडव्यालाच पुण्यात पावसाची हजेरी


पुणे, 19 मार्च (हिं.स.)। गुढीपाडव्याच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवलेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात काही भागांत हलक्या स्वरूपाचा पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारी पाऊण एकच्या सुमारास सिंहगड रस्ता वडगाव खुर्द परिसरात मेघगर्जनेसह हलका पाऊसला सुरुवात झाली आहे. शहरात सकाळी ऊन आणि ढगाळ असे वातावरण होते. दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि काही वेळात रिमझिम स्वरूपात पाऊस सुरू झाला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळल्याने नागरिकांची थोडी धांदल उडाली.

हवामान विभागाने पूर्वसूचना दिल्यानुसार पुणे शहरासह परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार सिंहगड रस्ता परिसरात काही वेळ पावसाची नोंद झाली. सणाच्या दिवशी अचानक पाऊस झाल्याने गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांवर काही प्रमाणात परिणाम झाला, तर दुपारनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला आहे. पुण्यातही मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ऐन कडक उन्हाळ्यादरम्यान पुणेकरांना पाऊस आणि थंड हवेची झुळूक अनुभवायला मिळाली.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande