अकोला : गुढीपाडव्याच्या दिवशीच मूर्तिजापूर मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन
अकोला, 19 मार्च (हिं.स.)। गुढीपाडव्याच्या दिवशी एकीकडे राज्यभर उत्साहाचं वातावरण असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने
Photo


अकोला, 19 मार्च (हिं.स.)।

गुढीपाडव्याच्या दिवशी एकीकडे राज्यभर उत्साहाचं वातावरण असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केल्या जात आहे.

ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे अन्नत्याग आंदोलन उभारलं जात आहे. बळीराजा हमीभाव कायदा तात्काळ पारित करावा, वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर शेत कुंपण योजना राबवावी, तसेच २०२५ च्या खरीप हंगामाचा पिक विमा तात्काळ मिळावा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात येत आहेत.

याशिवाय पिक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणीही शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे. सरकारकडून वारंवार आश्वासनं मिळूनही प्रत्यक्षात काहीच होत नसल्याने आता अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande