
चंद्रपूर, 23 मार्च (हिं.स.)।
महावितरणची वीजबिल वसुली मोहिम जोरात सुरू असून 26, 28, 29, 31 मार्चला सार्वजनिक सुटटीच्या दिवशी महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रात बिल भरता येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
महावितरण चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातर्फे गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात चालु विज देयके थकित विज देयके भरण्याकरीता वीज बिल वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. सांघीक कार्यालयाकडून दिलेले लक्ष-उददीष्टे साध्य करण्याकरीता चंद्रपूर परिमंडळा अंतर्गत 2 प्रविभाग व 6 विभागीय कार्यालये आणि 29 उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व अधिकारी-कर्मचारी थकबाकी व चालू विज देयके भरणा करण्याकरीता वसूली मोहिम सतत राबवित असून विज बिल वसुलीचे उददीष्टये गाठण्याकरीता मार्च महिन्यात वसुली मोहिम तीव्र करण्यात आलेली आहे.
आर्थिक वर्ष संपायला आता शेवटचे आठ दिवसाचा कालावधी उरला आहे. या आठ दिवसांमध्ये महावितरणला गडचिरोली व चंद्रपूर मंडळातील जवळपास आर.सी.आय. ग्राहकांकडे 31 कोटी रुपयाची थकित व चालु वीज बिलाची वसुली करायची आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाने विशेष वीज बिल वसुली मोहिम सुरु केली आहे. वीज देयके न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.
ज्या ग्राहकांकडे वीज बिल थकीत आहे अशा सर्व ग्राहकांना सर्वप्रथम फोन द्वारे माहिती दिली जात असुन त्यानंतरही वीज बिलाचा भरणा न केल्यास त्यांना प्रत्यक्ष भेटीद्वारे बिल भरणा करण्यास अवगत करण्यात येत आहे. वीज बिल मोहिमेस सहकार्य न करणाऱ्या ग्राहकांचा विदयुत पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येत आहे. तसेच महावितरणतर्फे वीज बिल वसुली मोहिम राबवितांना कार्यालयीन कामात व्यत्यय निर्माण होऊ नये याकरीता आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी पोलीस संरक्षणसुध्दा घेण्यात येत आहे. ग्राहकांच्या सोई सुविधेकरीता तसेच महावितरणच्या वीज बिल मोहिमेच्या कारवाईमुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरीता सार्वजनिक सुटटीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार देखील वीज बिल भरणा केंद्र, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात सुटटीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येत आहे. तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या कोठूनही वीज बिल भरणा करता येईल. वीज पुरवठा खंडित करण्याच्या कार्यवाहीपासुन ग्राहकांनी वंचित राहण्याकरीता चालु व थकित वीज बिलाचा मार्च-2026 अखेरीस सर्व वीज ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा करावा असे आवाहन चंद्रपूर महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव