शासकीय गोदामातील अन्नधान्याची थेट वाहतूक न करण्याची मागणी
नांदेड, 23 मार्च (हिं.स.)। शासनाने शासकीय अन्नधान्य गोदामातील धान्याची वाहतूक दोन टप्पे वगळून थेट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीच्या वाहतुकीच्या निर्णयामुळे हमाल मापाडी हातगाडा संघटनेतील कामगारांच्या हाताचे काम बंद होईल. त्यामुळे पूर्वीप्रमा
शासकीय गोदामातील अन्नधान्याची थेट वाहतूक न करण्याची मागणी


नांदेड, 23 मार्च (हिं.स.)।

शासनाने शासकीय अन्नधान्य गोदामातील धान्याची वाहतूक दोन टप्पे वगळून थेट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीच्या वाहतुकीच्या निर्णयामुळे हमाल मापाडी हातगाडा संघटनेतील कामगारांच्या हाताचे काम बंद होईल. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच दोन टप्प्यांत काम चालू ठेवावे, या मागणीचे निवेदन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे नांदेड हमाल मापाडी हातगाडा संघाच्या वतीने पाठविण्यात आले आहे.

हमाल मापाडी हातगाडा संघटनेतील कामगार खूप वर्षांपासून याच गोदामात काम करून पूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. नांदेडजिल्ह्यात २४० ते ३०० कामगार आजघडीला काम करतात. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना या निर्णयाचा फटका बसून उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाच्या नियमातच आजपर्यंत कामगार काम करत आले आहेत. मात्र, शासनाच्या काही कर्मचाऱ्यांच्या मर्जीन चालावे लागते. त्यामुळे हेच लोक त्यांच्या बचावासाठी आमच्या कामगारांची बदनामी करतात आणि स्वतः वेगळे राहातात. तसेच शासनाच्या टेंडरमध्ये टप्पा १ व टप्पा २ वाहतुकीच्या दरात फरकच नाही, असे असताना कामगारांचे काम अचानक बंद झाल्यामुळे हे कामगार व त्यांचे कुटुंब जगणार कसे, हा प्रश्न निर्माण होत आहे.

त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणेच कामाचे

स्वरूप ठेवून हमाल मापाडी हातगाडा संघटनेतील कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा धरणे आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा हमाल मापाडी हातगाडा संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब कांबळे, शिवाजी दराडे, मंगलसिंह परमार, देवीदास पल्लेवाड, गंगाधर नरवाडे व सर्व पदाधिकारी यांनी दिला आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande