नागपुरात वंचित–काँग्रेसचा संयुक्त मोर्चा; मोदींविरोधात घोषणाबाजी
नागपूर, 23 मार्च (हिं.स.) : नागपुरात सोमवारी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या वतीने संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा रिझर्व्ह बँक
नागपुरातीव वंचित–काँग्रेसचा संयुक्त मोर्चाचे छायाचित्र


नागपूर, 23 मार्च (हिं.स.) : नागपुरात सोमवारी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या वतीने संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चा रिझर्व्ह बँक चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय, महाल परिसरापर्यंत काढण्याची योजना होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे नेत्यांच्या भाषणानंतर झिरो माईल्स परिसरात मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सहभागी कार्यकर्त्यांच्या हातात सरकारविरोधी आणि संघविरोधी घोषणांचे फलक दिसून आले.मोर्चाच्या सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित करत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर निशाणा साधत, परदेशातील घडामोडींवर पंतप्रधान मोदी गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित केला.

मोर्चादरम्यान काही वक्त्यांनी भारताचे सार्वभौमत्त्व धोक्यात आल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली. तसेच पंतप्रधानांविरोधात विविध दावे करण्यात आले असून, त्या संदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठीच हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.याशिवाय, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका करत केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.मोर्चा शांततेत पार पडला असून शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande