सीता संस्कृती जपा, रील संस्कृती नको - राधाकृष्णजी महाराज
नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। प्राचीन काळापासून आदर्श असलेली सीतासंस्कृती जपणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने रील संस्कृतीला महिला प्राधान्य देत असल्याचे चित्र क्लेषदायी असल्याचे मत रामकथाकार राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र पिंप
सीता संस्कृती जपा, रील संस्कृती नको - राधाकृष्णजी महाराज


नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। प्राचीन काळापासून आदर्श असलेली सीतासंस्कृती जपणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने रील संस्कृतीला महिला प्राधान्य देत असल्याचे चित्र क्लेषदायी असल्याचे मत रामकथाकार राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र पिंपळगाव येथील रामकथेच्या सीतास्वयंवर, शिवधनुष्य उचलणे व सीता-राम यांचा विवाह या प्रसंगाचे रसाळ वाणीतून वर्णन केले.

यावेळी हरिद्वार येथील नरेंद्रनंद महाराज, मनोहरशरण महाराज पलसाना, योगी पुरणनाथ सोनखेडकर, योगीबापू उपळाई संस्थान, शिवानंद शिवाचार्य महाराज, माधव महाराज बोरगडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दत्त संस्थानचे बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी साधुसंतास्वागत केले. राधाकृष्णजी महाराज म्हणाले, स्त्रियांनी आई-वडील, सासू-सासऱ्यांच्या कौतुकास पात्र वर्तन करावे. रील काढून होणारे कौतुक समर्थनीय नाही. परप्रशंसा स्वार्थातून असते. सौंदर्य हे प्रसाधनातून नव्हे, तर कृती व भक्तीतून दिसावे. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे', असे लिखाण असलेले वाहन चुकीच्या ठिकाणी दिसणे क्लेशदायी आहे.

यज्ञातील साहित्य शुद्ध व यज्ञ करणाऱ्याचे मन पवित्र असावे. मन व यज्ञ साहित्यातील भेसळ यज्ञात नसावी. शील हे स्वाभाविक असल्यास सौंदर्य खुलते. कथा श्रवणातून सत्संग वाढते. कीर्तनातून आत्मिक कल्याण साधता येते. कर्म करताना गुरूचे स्मरण केल्यास संकल्पसिद्धी शक्य आहे. सुख गुरुचरणी असून, भक्ती विश्वासाने करावी. रावण सच्चा शिवभक्त होता. पण तो अहंकारी व गर्विष्ठ असल्याने आदर्श नाही. श्रीराम हे नित्य शिवस्मरण करणारे आदर्श आहेत. विचार आणि आहारामध्ये सात्विकता जपणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande