कापसीमध्ये हरिनाम सप्ताहाला प्रारंभ, दोन एप्रिलाला सांगता
नांदेड, 24 मार्च (हिं.स.)।कापसी बुद्रुक (ता. लोहा) येथील तीर्थक्षेत्र भगवान त्रिकुटेश्वर यात्रोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला असून, आगामी ३० मार्चपर्यंत चालणार आहे. सप्ताहात पहाटे काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भज
कापसीमध्ये हरिनाम सप्ताहाला प्रारंभ, दोन एप्रिलाला सांगता


नांदेड, 24 मार्च (हिं.स.)।कापसी बुद्रुक (ता. लोहा) येथील तीर्थक्षेत्र भगवान त्रिकुटेश्वर यात्रोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला असून, आगामी ३० मार्चपर्यंत चालणार आहे.

सप्ताहात पहाटे काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ व रात्री कीर्तन होत आहेत. यामध्ये चंद्रकांत महाराज लाठकर, कुलदीप महाराज शिरूर, रोहिदास महाराज कळका, निवृत्ती महाराज इसाद, बालाजी महाराज गुडेवार, ओंकार महाराज देशमुख, शंकर महाराज लोंढे, तर सोमवारी (ता.३०) सकाळी मधुसूदन महाराजगिरी यांचे काल्याचे कीर्तन होईल. भगवान त्रिकुटेश्वर यात्रेनिमित्त रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा, पालखी मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी लाभ घ्यावा.

पाचशे वर्षांपासूनची येथे शिव-पार्वती विवाह सोहळ्याची परंपरा आहे. सोमवारी (ता.३०) रात्री बाराला शिव-पार्वती विवाह सोहळा व मंगळवारी (ता.३१) पालखी मिरवणूक, तर गुरुवारी (ता. २) श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे मधुसूदन महाराजगिरी यांचे कीर्तन व महाप्रसाद होईल. त्यानंतर दुपारी चारला जंगी कुस्त्यांचा फड रंगणार असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.श्री भगवान त्रिकुटेश्वरांचे हेमाडपंती पुरातन शिवमंदिरात स्वयंभू महादेवाचे तीन शिवलिंग असल्यामुळे भगवान त्रिकुटेश्वर म्हणून ओळखले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande