
नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। किनवट येथील आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने येथे सर्वधर्मीय वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा व परिचय मेळावा पार पडला. यावेळी विधवा, विधूर, घटस्फोटित, परित्यक्ता, दिव्यांग विवाहेच्छुकांचा सहभाग लक्षणीय होता. या मेळाव्यात तीन जोडपी विवाहबद्ध झाली असून, त्यापैकी एका दिव्यांग वधू-वरांचा विवाह आकर्षण ठरला. नवदांपत्यांना प्रा. जयश्री भरणे यांच्या हस्ते सोन्याचे मणिमंगळसूत्र, चांदीची जोडवी देण्यात आले.
तसेच सामाजिक बांधिलकी जपत विधवा महिलांना पाच शिलाई मशीन, तर गरजू महिलांना शंभर साड्यांचे वितरण केले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व्यंकटरावजी नेम्मानीवार, प्रमुख पाहुणे म्हणून के. मूर्ती, नंदिनी टारपे, नगरसेवक राम नेम्मानिवार, निसार भाटी, अन्वर मिर्झा, गणेश दासरे, अॅड. मिलिंद सर्पे, राजू टारपे, अॅड. दिव्या पाटील, बबिता भंडारे, सुजाता पोहरे, लक्ष्मीकांत मुंडे, अनिल भंडारे, मोईस खान, कामराज माडपेल्लीवार, नसीर तगाले, गंगाधर कदम, आशाताई कदम, उषा वाढवे आदी उपस्थित होते. प्रा. सुरेश पाटील व प्रतिभा पाटील यांच्या गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis