नवीन 'स्मार्ट एसीं'सह गोदरेजचा 2026 चा एसी पोर्टफोलिओ सादर
मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। देशभरात तपमान वाढू लागल्याने, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस बिझनेसने 2026 साठी आपला अपग्रेडेड आणि भविष्यासाठी सज्ज असा एअर कंडिशनर पोर्टफोलिओ सादर केला आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एसी उत्पादकांपैकी एक
नवीन 'स्मार्ट एसीं'सह गोदरेजचा 2026 चा एसी पोर्टफोलिओ सादर


मुंबई, 25 मार्च (हिं.स.)। देशभरात तपमान वाढू लागल्याने, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस बिझनेसने 2026 साठी आपला अपग्रेडेड आणि भविष्यासाठी सज्ज असा एअर कंडिशनर पोर्टफोलिओ सादर केला आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एसी उत्पादकांपैकी एक असलेला हा ब्रँड, ग्राहकांना अधिक स्मार्ट, अधिक सोपा आणि प्रीमियम कूलिंग सोल्यूशन्स देण्याची आपली वचनबद्धता कायम राखतो आहे.

2026 च्या उन्हाळी पोर्टफोलिओमध्ये 1 टन ते 4 टन क्षमतेपर्यंतचे स्प्लिट एसी, कॅसेट एसी, टॉवर एसी आणि विंडो एसी यांचा समावेश आहे, ज्यात उच्च टनेजच्या मॉडेल्सवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ही उत्पादने 5 स्टार आणि 3 स्टार एनर्जी रेटिंगमध्ये उपलब्ध असून, स्मार्ट एसीवर विशेष भर देण्यात आला आहे.

आपल्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनानुसार, ब्रँडने आपल्या स्मार्ट पोर्टफोलिओमध्ये एक नवीन श्रेणी सादर केली आहे, ती म्हणजे संपूर्ण नवीन ‘स्मार्ट सिंक टेक्नॉलॉजी.’ भारतीय एसी बाजारपेठेत अशा प्रकारची ही पहिलीच श्रेणी आहे. स्मार्ट सिंकमुळे, वाय-फायची सुविधा असलेले गोदरेज एसी खोलीतील पंख्याशी कनेक्ट होऊन त्याला नियंत्रित करू शकतात, ज्यामुळे ग्राहकांना रात्री पंखा सुरू किंवा बंद करण्यासाठी उठण्याची गरज भासत नाही. आपल्या झोपेत कोणताही अडथळा न आणता एसी पंख्याचे व्यवस्थापन आपोआप आणि सहजतेने करतो.

स्मार्ट सिंक व्यतिरिक्त, आयओटी-सक्षम एसीमध्ये सुलभ ऊर्जा निरीक्षण, फिल्टर साफसफाईचे अलर्ट, पूर्वनियोजित वेळेनुसार सुरू/बंद, स्मार्ट डायग्नोस्टिक्स आणि अन्य अनेक गोष्टी उपलब्ध आहे. गोदरेजच्या डिझाइन-केंद्रित तत्त्वज्ञानाला नवीन इऑन मॅग्नेस सिरीजद्वारे हा पोर्टफोलिओ अधिक दृढ करतो, जी ग्लॉस ब्लॅक, मॅट सिल्व्हर, शॅम्पेन गोल्ड, एलिगंट व्हाइट आणि रिफ्लेक्टिव्ह मिरर फिनिशमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच आकर्षक ग्रे इऑन निंबस आणि भव्य इऑन रेगॅलिस हे मॉडेल्सही आहेत.

गोदरेज एंटरप्राइजेस समूहाच्या 'अप्लायन्सेस बिझनेस'चे प्रमुख कमल नंदी म्हणाले, अर्थपूर्ण मूल्य प्रदान करणारे आणि विचारपूर्वक आणलेले नावीन्य हाच आमच्या प्रत्येक कृतीचे मूळ आहे. एसी उद्योगासाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरले असून एकूण विक्रीत घट झाली असली, तरीही गोदरेजच्या एसीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. व्यावसायिक मूल्यांना धरून असलेली आमची उत्पादने, 5 वर्षांची सर्वसमावेशक एसी वॉरंटी आणि आमच्या रिटेल स्टोअरचा झालेला जलद विस्तार यांच्या बळावर, या उन्हाळ्यात 30% ते 40% वाढीचे आमचे उद्दिष्ट आहे.

नवीन उत्पादन श्रेणीबद्दल गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस बिझनेस विभागातील एअर कंडिशनर्सचे प्रॉडक्ट ग्रुप हेड, सब्यसाची गुप्ता म्हणाले, “मार्च महिन्यात आधीच उष्णतेची लाट आल्याने, येणारा उन्हाळाही तितकाच तीव्र असण्याची शक्यता आहे. आमचे एआय-सक्षम एसी उत्तम कूलिंग आणि ऊर्जा कार्यक्षमता दोन्ही देतात. सौम्य कूलिंगसाठी कम्फर्ट एअर फ्लो, एकसमान कूलिंगसाठी 4-वे स्विंग आणि स्मार्ट सोयीसुविधांच्या संचासारख्या अंतर्दृष्टी-आधारित वैशिष्ट्यांचा आधार आहे. गॅस रिफिल, टेक्निशियन भेटी आणि रिमोट रिप्लेसमेंट यांचा समावेश असलेली आमची 5 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी, निवडक मॉडेल्समध्ये सवलतीच्या दरात इन्स्टॉलेशन, परवडणारे ईएमआय आणि शून्य डाउन पेमेंट पर्यायांसह, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी दीर्घकाळ टिकणारे उत्तम गुणवत्तेचे उत्पादन देण्यास वचनबद्ध आहोत.”

भारतातील दुकानांमध्ये आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर गोदरेजचे एसी उपलब्ध आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande