उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये पिकअप-ट्रेलरची धडक; आठ जणांचा मृत्यू
लखनऊ, 27 मार्च (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील प्रयागराज-कानपूर महामार्गावर सैनी परिसरातील डोरमा गावाजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला अनियंत्रित पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झा
Pickup trailer accident in Kaushambi


लखनऊ, 27 मार्च (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील प्रयागराज-कानपूर महामार्गावर सैनी परिसरातील डोरमा गावाजवळ शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला अनियंत्रित पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून डझनभराहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमधील सर्व प्रवासी मुंडन संस्कारासाठी प्रयागराजच्या संगमावर गेले होते. संस्कार पूर्ण करून ते परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. फतेहपूर जिल्ह्यातील जाफरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुरोली गावातील दोन वर्षांच्या शुभमचा मुंडन सोहळा असल्याने कुटुंबीयांनी पिकअप भाड्याने घेतली होती. संगमावरून परतताना सैनीजवळ चालकाला झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रेलरला धडक बसली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पिकअपमध्ये सुमारे ३५ जण प्रवास करत होते, त्यामध्ये 11 लहान मुलांचाही समावेश होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन तात्काळ सक्रिय झाले. सीएमओने त्वरित १०८ रुग्णवाहिका सेवेला अलर्ट केले, त्यानंतर घटनास्थळी एकामागून एक रुग्णवाहिका दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना बाहेर काढून सिराथू येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात हलवले, त्यानंतर गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेश कुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमींची विचारपूस केली तसेच मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. या अपघाताची माहिती फतेहपूर पोलिसांनाही देण्यात आली आहे.

अपघातात काही महिलांसह लहान मुलांचाही मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये गुडिया, कल्लो, सुखरनिया, दर्शनिया, राजकुमारी यांचा समावेश असून ध्रुव, मयंक आणि आणखी एका बालकाचाही मृत्यू झाला आहे. एका मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande