२१ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन नांदेडमध्ये
नांदेड, 29 मार्च (हिं.स.)। सत्यशोधक विचार मंच आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी युनियन यांच्या वतीने ९ मे रोजी शहरात २१वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष
२१ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन नांदेडमध्ये


नांदेड, 29 मार्च (हिं.स.)। सत्यशोधक विचार मंच आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी युनियन यांच्या वतीने ९ मे रोजी शहरात २१वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार संजय आवटे, तर उद्घाटक म्हणून अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरख लोखंडे यांची उपस्थिती राहणार आहे.

संमेलनात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत, 'दंगल'कार नितीन चंदनशिवे, प्रा. रविचंद्र हडसनकर, प्रा. जगदीश कदम, डॉ. विजय कदम, डॉ.

जयवंतराव व्हटकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. दिवंगत आमदार नामदेवराव व्हटकर यांना 'भीमरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे चिरंजीव डॉ. जयवंतराव व्हटकर हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनात कविसंमेलन, प्रकट मुलाखती, विविध पुरस्कारांचे वितरण, साहित्यिकांचे गौरव समारंभतसेच सामाजिक विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी संमेलनाचे मुख्य संयोजक गणेश शिंगे, स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, समन्वयक अॅड. विजय गोणारकर, संयोजक लालबाजी घाटे, निमंत्रक जी. पी. मिसाळे, संयोजन समितीचे अध्यक्ष उन्मेष ढवळे उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande