बीड जिल्ह्यात आगामी १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू
बीड, 29 मार्च (हिं.स.)।बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी ९ एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आगामी काळात विविध संघटनांकडून होणारी आंदोलने, मोर
बीड जिल्ह्यात आगामी १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू


बीड, 29 मार्च (हिं.स.)।बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी ९ एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आगामी काळात विविध संघटनांकडून होणारी आंदोलने, मोर्चे आणि उपोषणांच्या शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) नुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना पूर्वपरवानगीशिवाय एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, स्फोटके किंवा दाहक पदार्थ बाळगणे प्रतिबंधित राहील. तसेच प्रक्षोभक भाषणे, सामाजिक सलोखा बिघडवणारी विधाने आणि आक्षेपार्ह पोस्टर्स लावणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणताही मोर्चा किंवा सभा आयोजित करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande