भामा आसखेड धरणात ६३.२५ टक्के साठा
पुणे, 29 मार्च (हिं.स.)। आंबेठाण - खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात आज ६३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा अधिक आहे.भामा आसखेड हे भामा नदीवर करंजविहिरे येथे उभारलेल
भामा आसखेड धरणात ६३.२५ टक्के साठा


पुणे, 29 मार्च (हिं.स.)। आंबेठाण - खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात आज ६३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा अधिक आहे.भामा आसखेड हे भामा नदीवर करंजविहिरे येथे उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. यावर्षी धरण परिसरात मुबलक म्हणजे १२०३ मिमी पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते.

भामा नदीवरील आलेगाव पागा पर्यंत असणारे १८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी आणि नागरवस्तीसाठी या धरणातील पाणी उचलले जाते.यासंदर्भात श्रेणी १, भामा आसखेडचे सहाय्यक अभियंता अश्विन पवार म्हणाले, ‘पाणी आता जरी जास्त दिसत असले तरी भविष्यात पिंपरी-चिंचवड आणि अन्य पाणी योजना सुरू झाल्यावर पाणी कमी शिल्लक राहील. शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी ठिबक सारख्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा. बंधाऱ्यांची दुरुस्ती याच वर्षी केली जाणार आहे. जेणेकरून पाणी गळती थांबविली जाईल. पाणी योजनेचे पाणी नागरिकांनी जपून वापरावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande