
मालेगाव, 29 मार्च (हिं.स.)।
- निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार याद्या पुनः निरीक्षण कार्यक्रमांमध्ये हलगर्जी केल्याप्रकरणी मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील 35 केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नोटीस बजावली आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाने
राज्यात १ एप्रिलपासून मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून बीएलओना मतदारांचे जिओ-मॅपिंग करणे, फोटोंचे अद्ययावतीकरण, दुबार मतदारांचा शोध घेणे आणि प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन तपासणी करणे अशा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यासाठी मालेगाव बाह्य मतदार संघात ३५१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कामात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील तब्बल ३५ केंद्रस्तरीय (बीएलओ) अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. सात दिवसांत कामाचा अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा या नोटिसांद्वारे देण्यात आला आहे.
मात्र, 'बीएलओ' अॅपवरील माहितीचे विश्लेषण केले असता, अनेक अधिकारी घरोघरी जाऊन मॅपिंग करत नसल्याचे समोर आले. तसेच मतदारांच्या फोटो दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले अर्ज क्रमांक ८ जमा करण्यातही कुचराई झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदार यादीची अचूकता आणि विश्वासार्हता प्रभावित होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याची गंभीर दखल घेऊन कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात प्रशासनातर्फे कठोर कारवाईचे पाऊल उचलले गेले आहे.
तेव्हा ज्यांना या संदर्भात नोटिसा मिळाल्या आहेत, त्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी सात दिवसांत आपले काम पूर्ण करून अहवाल सादर करावा. कोणत्याही प्रकारची सबब किंवा कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. ही कारवाई मतदार याद्या स्वच्छ, अचूक आणि विश्वासार्ह ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे चांगलीच कृपा उडाली असून प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी आता अधिक वेगाने काम करू लागले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV