बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा; 'फार्मर आयडी'तील त्रुटी सुधारण्यास सुरुवात
बीड, 29 मार्च (हिं.स.) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमध्ये असलेल्या गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. आमदार सुरेश धस यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्
बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा; 'फार्मर आयडी'तील त्रुटी सुधारण्यास सुरुवात


बीड, 29 मार्च (हिं.स.)

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमध्ये असलेल्या गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. आमदार सुरेश धस यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही दुरुस्ती प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा अधिक जमीन नोंदवली गेल्याने ते कागदोपत्री बहुभूधारक ठरून योजनांसाठी अपात्र होत होते. तहसीलदार वसीमा शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तलाठ्यांकडून अहवाल मागवून ही दुरुस्ती जमाबंदी विभागामार्फत केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह तत्काळ महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande