नांदेड -अनंत क्लबचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार
नांदेड, 29 मार्च (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अनंत क्लबचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला च
नांदेड -अनंत क्लबचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार


नांदेड, 29 मार्च (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अनंत क्लबचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, तसेच त्यांच्या बौद्धिक, सर्जनशील व सामाजिक क्षमतांचा विकास घडविणे हा या क्लब स्थापनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून दूर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहलानी उपस्थित होते. तर प्र कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संचालिका डॉ. रुपाली जैन यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रुपाली जैन यांनी अनंत क्लबची संकल्पना व उद्दिष्टे प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी गणित व सांख्यिकी विषयांचे डेटा सायन्स व क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील वाढते महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक कौशल्ये आत्मसात करून स्टार्टअप्स व उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande