मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला शासकीय ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा
बीड, 29 मार्च (हिं.स.)। मंत्री पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनवाहिनी असलेले हे रुग्णालय पूर्ण क्ष
शासकीय ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा


बीड, 29 मार्च (हिं.स.)।

मंत्री पंकजा मुंडे यांनी

अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या,

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनवाहिनी असलेले हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने रुग्णांच्या सेवेत कार्यरत राहावे यासाठी माझे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत. रुग्णालयाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मी विशेष लक्ष देणार आहे. मनुष्यबळ, रिक्त पदे, कर्करोग उपचार केंद्र यासह रूग्णालय परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण, सोलर, घनकचरा व्यवस्थापन यावर भर देण्याच्या सूचना रूग्णालय प्रशासनाला दिल्या.

रुग्णालयातील रिक्त पदांची भरती, आवश्यक मनुष्यबळ आणि औषध पुरवठा या बाबीसह अत्याधुनिक वैद्यकीय यंत्र आणि सामुग्री आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागांकडून माहिती घेतली, याकामी मंत्रालयीन स्तरावर विभाग निहाय बैठक घेऊन सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रुग्णालयाचे आणि नव्याने होत असलेल्या निर्माण कार्याचे कामे निधी अभावी थांबणार नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande