
नांदेड, 29 मार्च (हिं.स.)।
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२६ अंतर्गत, मुदखेड बस स्थानकाची विशेष तपासणी पथकाद्वारे करण्यात आली. या मोहिमेमुळे बस स्थानक परिसरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विशेष भर देण्यात येत आहे.
या मोहिमेसाठी धाराशिव विभागाचे
अजय पाटील विभाग नियंत्रक, प्रदीप सुतार कामगार अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पथकाने स्थानकाला भेट दिली.
यावेळी मुदखेड बस स्थानकाच्या वतीने आणि स्थानिक मान्यवरांच्या वाहतूक नियंत्रक निर्दोष पवार यांनी पथकाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
तपासणी दरम्यान पथकाने बस स्थानकाचा परिसर, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आणि प्रवासी बाकड्यांची बारकाईने पाहणी केली. केवळ कागदावर स्वच्छता न ठेवता ती प्रत्यक्षात दिसावी, यासाठी प्रशासकीय पातळीवरून सूचना देण्यात आल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरोग्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis