लातूरात पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत मंडल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
लातूर, 29 मार्च (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने ‘पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत मंडल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाअभियानाचे उद्घाटन माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते आज उत्साहपूर
लातूर भाजप


लातूर, 29 मार्च (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने ‘पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत मंडल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाअभियानाचे उद्घाटन माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडल व छत्रपती संभाजीराजे मंडलाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात तुकाराम गोरे यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर मार्गदर्शन करत पक्षाच्या विचारसरणीची मूलभूत तत्त्वे आणि त्याची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. कार्यकर्त्यांनी विचारांशी निष्ठा ठेवून समाजकार्य अधिक प्रभावीपणे कसे करावे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

सुधीर धुत्तेकर यांनी ‘कार्यपद्धती’ या विषयावर बोलताना संघटनात्मक कामकाजाची शिस्त, नियोजन आणि जबाबदाऱ्या यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभावी संवाद, टीमवर्क आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढवून पक्षकार्य अधिक सक्षम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर मार्गदर्शन करत संघटन मजबूत करण्यासाठी विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कार्यकर्त्यांनी ठाम विचार आणि मूल्यांवर आधारित कार्य करण्याचे आवाहन केले.

तसेच आनंद बारपुते यांनी सरकारच्या कामगिरीविषयी माहिती देत विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा आढावा घेतला. त्यांनी कार्यकर्त्यांनी ही माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षण अभियानाला मंडलाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande