
बीड, 29 मार्च (हिं.स.)। भारतीय जनता पक्ष, कुसळंब ता. पाटोदा यांच्या वतीने आयोजित “सक्षम कार्यकर्ता सशक्त संघटन : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६”याचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून सरकारची कामगिरी या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा उपक्रम ठरला.
या प्रसंगी श्री. किरण पाटील यांनी बूथ व्यवस्थापन व मन की बात या विषयावर भारतीय जनता पार्टी चा इतिहास सांगत मार्गदर्शन केले.
श्री. दयावान मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी कार्य विस्तार व कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. बालाजी पवार, श्री. सुरेश उगलमुगले आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis