
बीड, 29 मार्च (हिं.स.)।
भारतीय जनता पक्ष, शिरूर कासार यांच्या वतीने आयोजित “सक्षम कार्यकर्ता - सशक्त संघटन : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६” अत्यंत उत्साहात पार पडले.
या प्रशिक्षण शिबिरात विविध सत्रांद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सत्रादरम्यान श्री. पवन मोगरेकर यांनी 'सोशल मीडिया सुलभ अॅप' व ‘नमो मार्गदर्शन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री. किरण पाटील यांनी सहाव्या सत्रात भाजपच्या कार्यपद्धती, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सातव्या सत्रात आमदार सुरेश धस यांनी स्वतः उपस्थित कार्यकर्त्यांना शासनाच्या विविध योजना, विकासात्मक धोरणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी विचार देत जनसेवेसाठी अधिक जोमाने व नव्या उत्साहाने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यकर्त्यांचा उत्साह, शिस्तबद्धता आणि संघटनाबद्दलची निष्ठा यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. या प्रशिक्षण अभियानात तालुक्यातील पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख, युवा कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis