मार्च एंडमुळे निधी खर्चाची घाई; सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू
नांदेड, 29 मार्च (हिं.स.)। आर्थिक वर्षाच्या अखेरीस ''मार्च एंडिंग''चा ताण शासकीय कार्यालयांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. निधी शिल्लक राहू नये यासाठी विविध विभागांकडून खर्चाची घाई सुरू आहे. सुटीच्या दिवशीही अनेक कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. जि
मार्च एंडमुळे निधी खर्चाची घाई; सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू


नांदेड, 29 मार्च (हिं.स.)।

आर्थिक वर्षाच्या अखेरीस 'मार्च एंडिंग'चा ताण शासकीय कार्यालयांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. निधी शिल्लक राहू नये यासाठी विविध विभागांकडून खर्चाची घाई सुरू आहे. सुटीच्या दिवशीही अनेक कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना वितरित करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करणे बंधनकारक असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी, शनिवार-रविवार तसेच इतर सुटीच्या दिवशीही कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले आहे. अनेक ठिकाणी बिलांची पूर्तता, प्रलंबित कामे पूर्ण करणे, तसेच निधी खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याची लगबग दिसून येत आहे. विशेषतः बांधकाम, शिक्षण,

आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती आणि पंचायत राज विभागात निधी खर्चासाठी लगबग सुरू आहे. काही ठिकाणी कामे पूर्णत्वास नेण्यासाठी कंत्राटदारांनाही तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अल्पावधीत कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मार्च एंडिंगच्या या घाईगडबडीत कामांची गुणवत्ता अबाधित ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी केवळ निधी खर्च करण्यासाठी घाईघाईने निर्णय घेतले जात असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande