
लातूर, 29 मार्च (हिं.स.)।
लातूर जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नेहे-विरोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्हा परिषद समिती सभापती पदाच्या निवडीसाठी ३० मार्च, २०२६ रोजी दुपारी २ वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे विशेष सभा आयोजित करण्यात आलेली आहे. विशेष सभेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांना सदर विशेष सभेची नोटीस (नमुना-अ) देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis