माजी सैनिक कल्याण संघटना अध्यक्षपदी सुबोधकुमार मिश्रा
Subodh Kumar Mishra appointed as President of Ex-Servicemen Welfare Association
माजी सैनिक कल्याण संघटना अध्यक्षपदी सुबोधकुमार मिश्रा


नाशिक, 29 मार्च (हिं.स.)।

माजी सैनिक कल्याण संघटनेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच नाशिकरोड येथे झाली. या अटीतटीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवृत्त नौसेना अधिकारी सुबोधकुमार मिश्रा बहुमतांनी विजयी झाले. त्यांचे व नवनिर्वाचित सहकाऱ्यांचे जल्लोषात अभिनंदन, स्वागत करण्यात आले. कार्यकारिणीच्या ११ पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यासाठी २२ माजी सैनिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सुबोधकुमार मिश्रा सर्वाधिक मतांनी विजयी झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी घोषित करण्यात आली. जनरल सेक्रेटरी - बिपिनचंद्र मुनगली, सचिव - मारुती पाटील व अजितसिंह राणा, सहसचिव - भगवान विंचू , कोषाध्यक्ष - शैलेशप्रताप सिंह, सदस्य पदावर हरिप्रसाद पांडे, अंगद सिंह, बिजेंद्रकुमार मिश्रा यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्नल एस. एन. मिश्रा, एम.सी दिवाकरन, दिलीप बडगुजर यांनी कामकाज बघितले. नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला व सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande