
डोंबिवली, 29 मार्च, (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिर सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातील डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी अनेक शिवसैनिकासह भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपा कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे,भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, सचिन चिटणीस, जुनी डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, ज्योती पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टी पक्षावर विश्वास ठेवत अनेकजण प्रवेश करत आहेत. देशाचा विकास हाच भारतीय जनता पार्टीचा ध्यास असल्याने अनेक जण पक्ष्यात प्रवेश घेत आहेत.
तर भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत अजून अनेकजण प्रवेश करतील असा मला विश्वास आहे.
प्रकाश तेलगोटे यांनी प्रवेशानंतर थेट ठाकरेंची शिवसेनेवर निशाणा साधला. ठाकरेंची शिवसेना पक्षात काम करताना माझ्यावर अन्याय झाला. मला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. ठाकरेंची शिवसेना पक्षात स्थानिक राजकारण होत असल्याचा आरोपहि तेलगोटे यांनी यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi