घाऊक बाजारात कांदा ८ रुपये किलो, मागणीत घट, आवक जास्त; शेतकरी अडचणीत
नांदेड, 29 मार्च (हिं.स.)। एकीकडे मागणीत तब्बल ६० टक्क्यांची घट झालेली असताना जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे नांदेडच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर सरासरी ८ ते १० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकर
घाऊक बाजारात कांदा ८ रुपये किलो, मागणीत घट, आवक जास्त; शेतकरी अडचणीत


नांदेड, 29 मार्च (हिं.स.)।

एकीकडे मागणीत तब्बल ६० टक्क्यांची घट झालेली असताना जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे नांदेडच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर सरासरी ८ ते १० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे, किरकोळ बाजारात मात्र कांदा २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

स्थानिक कांद्याबरोबरच आंध्र प्रदेशातील लाल कांद्याचीही मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. उत्पादन चांगले झाले असले तरी मागणी घटल्याने बाजारात मागणी नाही. विशेषतः आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्यात आणि हॉटेल-खानावळींचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केली असून, याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande