
बीड, 06 मार्च, (हिं.स.)। माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदभरती अनुषंगाने लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक पूर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु काही प्रशासकीय कारणास्तव ७ मार्च रोजी होणारी मुलाखत ११ मार्च रोजी होणार आहे.
पोलीस पाटील पदभरतीची मुलाखत ७ मार्च २०२६ रोजी होणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव सदरील ७मार्चची मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. ती मुलाखत ११ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, मुलाखतीस उपस्थित राहताना ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणणे बंधनकारक राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis