
लखनऊ, 07 मार्च (हिं.स.) - उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे लखनऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ते कौशांबीला जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळे हवेत धुराचे लोट पसरले. पायलटने तात्काळ अमौसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले.
केशव प्रसाद मौर्य यांचा कौशांबी येथे एक कार्यक्रम होता. त्यांच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत, ते सायरा येथील बाबू सिंग डिग्री कॉलेजच्या मैदानावर सारस महोत्सवाचे उद्घाटन करणार होते. शनिवारी सकाळी लखनऊच्या ला मार्ट मैदानावरून कौशांबीसाठी उड्डाण करताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टरमध्ये लगेचच धुराचे लोट पसरले.
वैमानिकाला धोका जाणवला आणि त्याने एटीसीशी संपर्क साधला. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरले. सुदैवाने, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या घटनेत सुरक्षित राहिले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे